माखजन : वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीक मोर्डे येथे श्री स्वामी समर्थांच्या मठात चिपळूण चे प्रख्यात गायक विशारद गुरव याची गायन मैफिल होणार आहे.
श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त या गायन मैफिली चे आयोजन करण्यात आले आहे.२३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गायन मैफिल होणार आहे.यावेळी हार्मोनियम ची साथ सुशील गद्रे,तबला साथ अथर्व आठल्ये करणार आहेत.
या मठात २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.











