शिरवली देऊळवाडी मोर्येवाडी येथील जांगलदेव मंदिराचा २० आणि २१ डिसेंबर रोजी जिर्णोद्धार आणि जत्रोत्सव सोहळा

 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरवली देऊळवाडी मोर्येवाडी येथील श्री जांगलदेव मंदिराचा जिर्णोद्धार, जत्रोत्सव आणि सत्यनारायण महापूजा असा संयुक्त कार्यक्रम दिनांक २१ आणि २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे
श्री जांगलदेव सेवा संप्रदाय मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री जांगलदेव मंदिराचा उत्सव हा सन १९७१ पासून साजरा केला जात आहे. ज्यावेळी या मंडळाची स्थापना करण्यात आली. यापूर्वी या ठिकाणी मंदिर नव्हते. पायरीचे झाड होते .त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जात असे.त्यानंतर सध्या त्या ठिकाणी भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार ,जत्रोत्सव आणि सत्यनारायणाची महापूजा असा संयुक्त कार्यक्रम हा २० आणि २१ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे .

 

 

या उत्सवांतर्गत दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ श्री जंगलदेव मंदिर कलशारोहण, होम हवन ,दुपारी १ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ८ वाजता ह भ प अनिलबुवा राजापकर यांचे भजन. दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा ,दुपारी २ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ७.३० दीपोत्सव त्यानंतर समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना लांजा पुरस्कृत ह भ प श्रीहरी पवार महाराज आणि सहकारी यांच्या सुश्राव्य हरीपाठाचा कार्यक्रम होणार असून रात्री १०.३०वाजता महाकाली नमन मंडळ कोलधे यांचा नमनाचा कार्यक्रम होणार आहे .घ
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गणपत राजापकर ,उपाध्यक्ष दीपक मोडक, सेक्रेटरी पांडुरंग राजपकर, खजिनदार यशवंत मोर्ये, त्याचप्रमाणे देऊळवाडी वाडीप्रमुख कृष्णा राजापकर, आणि मोर्येवाडी प्रमुख संजय राजापकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ, वाडकरी मेहनत घेत आहेत.