राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा पणन महासंघाच्या वतीने सन्मान

 

 

नागपूर येथे राज्यातील सर्व संचालकांनी घेतली भेट 

वैभववाडी l प्रतिनिधी :  नागपूर येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे चेअरमन श्री दत्तात्रय पानसरे व राज्यातील सर्व संचालकांनी भेट घेत अभिनंदन केले. महासंघाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी व्हाइस चेअरमन रोहित निकम, संचालक प्रमोद रावराणे सिंधुदुर्ग, अतुल गण्यारपवार गडचिरोली, पांडुरंग घुगे छ. संभाजी नगर, बळवंत पाटील नांदेड, नितिन हिवसे अमरावती, रमेश हिंगणकर अकोला, आबासाहेब पाटील लातुर, संजय पवार जळगांव, सुभाष रघाताटे चंद्रपुर, राहूल काकडे पुणे, अशोक हटकर बुलढाणा, धनश्री घाटगे कोल्हापुर, अयोध्या धस धाराशिव, संदिप नरके कोल्हापुर, सुनिल चव्हाण धाराशिव आदी उपस्थित होते.