कोणावरही कारवाई होणार नाही, घाबरू नका – भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे

 

खेड : खेड शहरात आढळून आलेल्या गो वंशहत्या प्रकरणी खेड वासीयांनी पुकारलेल्या बंदला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून शहर व तालुका परिसरातील दुकाने शंभर टक्के बंद असल्याचे चित्र यानिमित्त पहावयास मिळत होते. यावेळी सकल हिंदू समाजाकडून खेड पोलिसांना निषेध नोंदवणारे निवेदन देण्यात आले. यादरम्यान खेड पोलिसांनी उपस्थितांना आवाहन करताना कोणीही भावना भडतील अशा प्रकारचे मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ नये असे सांगत अशा प्रकारचे मेसेज टाकणाऱ्या कारवाई करण्याचा इशारा देखील खेड पोलिसांनी यावेळी दिला होता.

यादरम्यान खेड भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी उपस्थितांना घाबरू नका कोणावरही कारवाई होणार नाही असा दिलासा देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे जाहीरपणे सांगितले. तसेच यावेळी नागरिकांच्या भावना दुखावले आहेत ते त्या व्यक्त करणारच असे वक्तव्यही त्यांनी केले.