शांताराम पोवार यांचे निधन

 

 

रत्नागिरी : येथील जिल्हा परिषदेत कक्ष अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आंबेडकरवाडी येथील रहिवासी शांताराम पोवार यांचे मंगळवारी (दि. १७ डिसेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

 

रत्नागिरी शहरातील आंबेडकरवाडी येथील मूळ रहिवासी असलेले शांताराम पवार गावशाखेचे माजी अध्यक्ष होते. त्यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग कायम राहिला. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ३८ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर सामान्य प्रशासन विभागातून कक्ष अधिकारी म्हणून २००६ साली ते सेवानिवृत्त झाले होते.

गेल्या काही वर्षांपासून त्यांचे वास्तव्य शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे होते. काही काळापासून ते आजारी होते. मात्र, मंगळवारी आकस्मिकरीत्या त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.

पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम दिनांक 29. 12 .2024 कारवांचीवाडी येथे सकाळी 11 वाजता आहे.