जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

गावखडी / वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभीस ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार विषय शिक्षिका माननीय सौ.शर्वरी करगुटकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.याप्रसंगी इनचार्ज मुख्याध्यापिका सौ.संजया पावसकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, अंगणवाडी शिक्षिका सौ.सुनिता मेस्त्री, मदतनीस आकांक्षा गुरव , शालेय मंत्रिमंडळाचे मुखमंत्री कु. श्रवण गोठणकर, उपमुख्यमंत्री कु.श्रावणी कुरतडकर आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात या मेर्वी शाळेच्या इनचार्ज मुख्याध्यापिका सौ.संजया पावसकर, विषय शिक्षिका सौ.शर्वरी करगुटकर, अंगणवाडी शिक्षिका सौ.सुनिता मेस्त्री, अंगणवाडी मदतनीस आकांक्षा गुरव आदींचा जि.प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 

या बालदिना निमित्त या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे केली.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, विषय शिक्षिका सौ.शर्वरी करगुटकर आदिंनी आपल्या मनोगतातून कथन केले.तसेच सावित्रीबाई फुले यांचा आपण सर्वांनीच आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.
शेवटी उपशिक्षिका सौ.संजया पावसकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.