सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले व उडेली या दोन धरण प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार १८ जानेवारी रोज माजी शालेय शिक्षण मंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या – मृद व जलसंधारण विभाग, लघुपाटबंधारे योजनेंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले व उडेली येथील धरण प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यातील वेर्ले येथील धरण प्रकल्पासाठी ९८१३.७१ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ३२५.०० मीटर बांधकाम असलेल्या या धरणामध्ये ३०.४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असणार असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र ५.८० चौ. कि.मी. इतके आहे. या धरणातून सिंचन क्षेत्र २४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर सावंतवाडी तालुक्यातील उडेली येथील धरण प्रकल्पासाठी ७००५.६९ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून या धरणा चे बांधकाम ३१०.०० मीटर इतके असणार आहे. या धरणामध्ये पाणीसाठा ९८.८९ दशलक्ष घनफुट इतका असणार आहे तर या धरणाचे पाणलोट क्षेत्र ६.२० चौ. कि.मी. इतकी आहे. तर या धरणामधून सिंचन क्षेत्र २२० हेक्टर इतके असणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या महत्त्वकांक्षी योजनेतून मंजूर झालेल्या या दोन धरणांचा भूमिपूजन सोहळा होत आहे. वेर्ले येथील धरणाचा भूमिपूजन सोहळा दुपारी २ वाजता तर उडेली येथील धरणाचा भूमिपूजन सोहळा साडेचार वाजता होणार आहेत.
तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते १८ जानेवारीला सकाळी नऊ वाजल्यापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे यामध्ये अर्थसंकल्पीय बजेट निधी सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर झाला असून या अंतर्गत आडेली वजराट, होडावडा मातोंड आजगांव रस्ता प्रजिमा ५६ किमी. १/९०० मध्ये पुलाचे बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला तालुक्यातील आडेली वजराट होडावडा धाकोरा आजगांव रस्ता प्रजिमा ५६ किमी. १/०० ते १/९०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम वजराट देऊळवाडी येथे होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर वजराट देवसू कामळेवीर रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा वजराट सोसायटीजवळ आयोजित करण्यात आला आहे तरी या सर्व कार्यक्रमासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले आहे.











