राजापूर (वार्ताहर): वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ मौजे शीळ यांचे वतीने शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ८.०० ते रात्रौ ९.०० वा. या वेळात सद्गुरु ह. भ. प. विश्वनाथ (भाई) गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
शीळ येथील जि. प. शाळा शीळ नं. १ मागील पटांगणावर हा कार्यक्रम होणार असून सकाळी ८.०० वा. श्रींचे पूजन, आरती, हरिपाठ, सकाळी १०.३० ते ११.३० वा. श्री महालक्ष्मी वारकरी भजन, सोल्ये, सकाळी ११.३० ते १.०० वा. ह. भ. प. गुरूवर्य भाई महाराज गोसावी यांचे प्रवचन दुपारी १.०० ते २.०० वा. महाप्रसाद दुपारी २.०० ते ३.०० वा.गिरीष विचारे यांचे सुस्वर गायन दुपारी ३.०० ते ४.३० वा. स्थानिक भजने आणि महिलांचे कार्यक्रम, सायं. ५.०० ते ६.३० वा. ह.भ.प. कुर्णेकर महाराज यांचा हरिपाठ सोनू बाबा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संस्था भांबेड पंचक्रोशी सायं. ६.३० ते रात्रौ ८.०० वा. किर्तनकार ह.भ.प. राजेश राजशिर्के महाराज, सावर्डे, चिपळूण यांचे हरिकीर्तन होणार आहे.
तरी पंचक्रोशीतील वारकरी भाविकांनी उपस्थीत राहून नामसकिर्तन व अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त वारकरी सांप्रदाय व शीळ ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.










