अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी :शहरातील काँग्रसे भवन येथील एका हॉटेल समोर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने पर्स चोरुन नेली. पर्समध्ये 2 मोबाईल,रोख रक्कम असा एकूण 41 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना रविवार 19 जानेवारी रोजी रात्री 8.20 ते 9.20 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत सुरेशकुमार लच्छाराम चौधरी (31,रा.पर्याची आळी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री ते व्हेज ट्रीट हॉटेलच्या समोरील मोकळ्या जागेत आपली कार (एमएच-08-एएच-8434) ही पार्क करुन जेवण्यासाठी आतमध्ये गेले होते. जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर आले असता त्यांना कारची मागील डाव्याबाजूची काच फोडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी कारमध्ये जाउन पाहिल्यानंतर कारमधील पर्स चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











