खेड(प्रतिनिधी)खेड खाडीपट्टा भागातील कोरेगाव-संगलट रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून संपूर्ण डोंबरीकरण उखडून गेले आहे. या रस्त्यावर वाहने चालवणे कठीण झाले आहे याबाबत योग्य ती दखल न घेतली गेल्यास प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे
कोरेगाव संगलट रस्त्याच्या दुर्दशेने वाहनधारक, नागरिक हैराण झाले आहेत. खड्डा रस्त्यात की रस्ता खड्डयात हेच समजत नसल्याने वाहन चालकांसह नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. या रस्त्यातून चार चाकी, दोन चाकी, तीन चाकी गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अनेक वेळा बांधकाम खात्याकडे तक्रारी करून कोणतीच दखल घेतली जात नाही याबाबत
२६ जानेवारी रोजी बांधकाम खात्याच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे










