खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील सुकीवली किववाडी येथील कोकण रेल्वेच्या ब्रिजची बांधणी पूर्णपणे चुकीची झाली असल्याने ‘या ब्रिजची नवीन बांधणी करून सुधारणा करणे गरजेचे असल्याचे निवेदन सुकीवली गवळवाडी येथील रमेश महादेव घोले यांनी निवेदनाद्वारे नवी मुंबई बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे केली आहे.
कोकण रेल्वेच्या सुकिवली किववाडी ब्रिजची बांधणी पूर्णपणे चुकीची झालेली आहे. तरी त्या ब्रिजच्या बांधणीमुळे अपघात होऊन जीवित हानी होत आहे. दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास बुलेरो पिकअप आणि कार यांचा समोरासमोर अपघात झाला आहे. या संदर्भात रीतसर पोलिस स्टेशन मध्ये या अपघाताचा पंचनामा झालेला आहे. तरी पुन्हा जीवित हानी होऊ नये यासाठी आपणाकडून लवकरात लवकर या ब्रिजची नवीन बांधणी करून सुधारणा करणे गरजेचे आहे.
या ब्रिजची नवीन बांधणी झाली नाही तर कोकण रेल्वे विरोधात ब्रिजखाली आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी कोकण रेल्वे प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.










