खेड (प्रतिनिधी) खेड नगरपरिषदेने थकित पाणीपुरवठा।पाणीपट्टीधारकांना खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसात आणखी ८ थकितदारांना पाणी विभागाच्या पथकाने दणका दिला.
मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात येत आहेत. पाणीपट्टी भरणा करण्याबाबत सूचना करूनही
त्याकडे कानाडोळा करणाऱ्या थकितदारांवर कारवाई करण्यास सुरूवात केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई टाळण्यासाठी
थकितदारांकडून पाणीपट्टी भरणा केली जात आहे. मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.








