निर्मनुष्य बेटांवर प्रशासनाने केले ध्वजारोहण 

मालवण समुद्रातील कवडा रॉक, धोनतारा रॉक, पद्मदुर्ग यां ठिकाणी पहिल्यांदा ध्वजारोहण

अमित खोत | मालवण : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मालवण सागरी जलधीक्षेत्रातील पद्मदुर्ग, कवडा रॉक, धोनतारा यां निर्मनुष्य बेटांवर प्रशासनाने ध्वजारोहण केले.

सागरी सीमा अभेद्य आहेत. घातपाती कार्यवाया करिता सागरी सीमेचा वापर होऊ नये. समुद्रातील निर्मनुष्य बेटे निगराणी खाली ठेवणे, परिस्थिती समजून घेणे यां उद्देशाने मनुष्य व निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

कवडा रॉक

कवडा रॉक यां ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर पोलीस हवालदार सुशांत पवार, पोलीस कर्मचारी कैलास ढोले, महादेव घागरे, तुकाराम बिबे, पोलीस उपनिरीक्षक शकील अहमद सागर सुरक्षा, ग्राममहसूल अधिकारी निलेश वरुडे, कृषी सेवक विवेक रंगे, कनिष्ठ अभियंता नितीन पोवार, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, लायन्स क्लब अध्यक्ष महेश अंधारी, सेक्रेटरी फॅनी फर्नांडिस, खजिनदार पल्लवी तारी, उमेश शिरोडकर, शांती पटेल, मुकेश बावकर, नाना साईल, वैशाली शंकरदास मार्शल फर्नांडिस तसेच फिशरीज विभागचे मायाबा, रॉक आयलंड बोटचे संदीप शेलटकर, रजनीकांत देऊलकर, शशांक शेलटकर, ड्रोन कॅमेरासह क्षितिज हुणारी उपस्थीत होते.

पद्मदुर्ग

पद्मदुर्ग या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, गुरुप्रसाद परब, मुकुंद आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, सौ. स्मृती कांदळगांवकर, आनंद हुले, मातृत्व आधार संस्थापक संतोष लुडबे, नारायण धुरी, संदीप बोडवे, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, जगदीश तोडणकर, अक्षय रेवंडकर यांसह अन्य उपस्थित होते.

धोनतारा रॉक

धोनतारा रॉक येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, सागरी सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक रामजीलाल पटले, पोलीस कर्मचारी रेडकर, खुडे, यांसह अन्य अधिकारी तसेच रोटरी क्लब मालवण अध्यक्ष रमाकांत वाक्कर, सचिव पंकज पेडणेकर, असि. गव्हर्नर महादेव पाटकर, बाळू तारी, अभय कदम, सुहास ओरसकर, अभय कवटकर, प्रदिप सामंत यांसह अन्य उपस्थित होते.