तळे येथे १ फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज मंदिराचा कोनशीला पूजन सोहळा

खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथील संत गाडगे महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यानिमित्त या मंदिराचा कोनशीला पूजन सोहळा १ फेब्रुवारी  रोजी संत महतांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
मंदिराचे संचालक ह भ प श्री प्रकाश महाराज पालकर यांनी ही माहिती दिली आहे. तळे येथे वैकुंठवासी निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज मंदिरामध्ये गेली अनेक वर्ष विविध उत्सव आणि सण साजरी करण्यात येतात.  यावर्षी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ १ फेब्रुवारी  रोजी मंदिराचा कोनशीला पूजन सोहळा आयोजित करून करण्यात येणार आहे.  सकाळी ९ ते १० वा. दरम्यान कोनशीला पूजन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
या सोहळ्यासाठी खेड तालुक्यासह राज्यातील संत महंत उपस्थित राहणार आहेत.  या सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे  असे आवाहन श्री पालकर महाराज यांनी केले आहे.