बँकेत वाद : लोकाधिकार समिती सदस्यांसह नागरिकांची गर्दी : पोलीस दाखल : लिलाव प्रक्रिया थांबली
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील एका राष्ट्रीयकृत बैंकमध्ये एका कर्जदार ग्राहकाच्या सुरु असलेला सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव बेकायदेशीर असल्याचा दावा करीत कर्जदार आणि त्यांचे सहकारी यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली. कर्जदाराकडून थकित कर्जाची परतफेड करण्याची रक्कम बँकेत जमा करण्यात येत असतानाही बँक मॅनेजर मनमानीपणे सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. लोकाधिकार समिती सदस्य त्या ठिकाणी पोहचले. व अन्यायग्रस्त कर्जदार यांना पाठिंबा दर्शवला.
दरम्यान, पोलिसांना टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधत तक्रार नोंदवली. मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्व प्रकरण जाणून घेतले. त्यानंतर बँकेतील लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली.
राष्ट्रीयकृत बँकेत सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया दुपारी सुरू झाली होती. यावेळी उपस्थित असलेल्या एका कर्जदाराने लिलावातील आपले दागिने परत मिळविण्यासाठी आवश्यक असणारी बँकेच्या कर्जाची रक्कम व व्याज बँकेत जमा करण्याची तयारी दर्शविली. पैसे भरतो आपले दागिने मिळावे असे सांगितले. मात्र कर्जदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत बँक मॅनेजर यांनी दागिन्यांचा लिलाव होणारच, अशी भूमिका घेतली असा आरोप करण्यात आला. त्यामुळे कर्जदार महिलेच्या पाठिशी उभे राहिलेले इतर नागरिक आक्रमक बनले. कर्जाची रक्कम भरून घेऊन दागिने देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले. संबंधित कर्जदाराचे दुसरे एक वैयक्तिक कर्जाचे प्रकरण बँकेत असल्याने बँक मॅनेजर यांच्याकडून त्या कर्जाची रक्कम भरण्याची सूचना करण्यात येऊ लागली. मात्र आज लिलाव असणारे दागिने परत घेण्यासाठी आवश्यक असणारी रक्कम आम्ही देत असल्याने आम्हाला दागिने परत करा, अशी भूमिका कर्जदाराने घेतली होती. बँकेतील वाद वाढत गेल्याने नागरिकांचीही गर्दी बँकेच्या बाहेर झाली होती. यावेळी त्या ठिकाणी











