सावंतवाडीत शुभांगी ऑप्टिक्सच्या नव्या दालनाचा शुभारंभ

एस. एस. ऑप्टिक्स ग्राहकांच्या सेवेत रुजू

सावंतवाडी । प्रतिनिधी : ऑप्टिक्स क्षेत्रातील विश्वसनीय नाव असलेल्या शुभांगी ऑप्टिक्सच्या एस एस ऑप्टिक्स या नव्या दालनाचा भव्य शुभारंभ मंगळवारी संपन्न झाला. गवळी तिठा येथील तक्ष बिल्डिंगच्या तळमजल्यावर एस एस ऑप्टिक्सचे हे नवे दालन सुरू करण्यात आले असून ते आजपासून ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले. या दालनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदचे जिल्हा व्यवस्थापक निलेश वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस एस ऑप्टिक्सच्या प्रोप्रायटर तथा जीवन ग्राम संघ कुंभार्लीच्या अध्यक्षा सौ. स्नेहल हरमलकर, सचिन हरमलकर, महेश शिरोडकर, गणपत अणावकर, हेमंत जिकमडे, विष्णु तेंडुलकर, उमेदच्या तालुका व्यवस्थापक स्वाती रेडकर, तालुका व्यवस्थापक रिधिमा पाटकर, श्री. गवंडे, तळवडे प्रभाग समन्वयक सचिन नाईक, अनमोल प्रभाग संघ सचिव रंजना तेली, रुपाली गुडेकर, श्रुती रेडकर यांच्यासह अन्य केडर तसेच साधना समूहातील सर्व सदस्य उपस्थित होते.