रोहिले येथील नेत्रा भाटकर यांचे निधन

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यातील रोहिले येथील नेत्रा सुनील भाटकर वय वर्षे 50 यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.

नेत्रा भाटकर हे काही दिवस आजारी होत्या. त्यांना डेरवण येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्या उपचारास कोणताही प्रतिसाद देत नव्हत्या .म्हणून त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यांचे १ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पश्चात पती असा परिवार आहे.