शृंगारतळी येथील जीवनज्योती विशेष शाळेतील विद्यार्थी व पालकांशी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी साधला संवाद

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊचे वाटप

गुहागर |  प्रतिनिधी : महसुल सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम राबविले जात असून शुक्रवारी गुहागर तहसिल कार्यालयाच्या वतीने शृंगारतळी येथील जीवनज्योती विशेष शाळा ( मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र) येथे जनसंवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी या शाळेला भेट दिली. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, सहा.गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, तसेच महसूल विभाग व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जीवन ज्योती विशेष शाळेतील विद्यार्थी व पालकांशी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी संवाद साधला तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले शाळेच्या मुख्या. सुषमा शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी अजिक्य पेडणेकर यांनी शाळेबद्दल माहीती देताना सांगितले की, या शाळेमध्ये २७ विद्यार्थी शिक्षण व व्यावसायिकेचे धडे घेत आहेत, येथे शाळा अनुदान नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था व्हावी अशी विनंती केली, विद्यार्थीमध्ये शैक्षणिक, शारिरिक प्रगती व सुधारणा होत आहे यासाठी शाळेमध्ये फिजोओथेरफी कीट उपलब्ध आहे,मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाते, यातील काही विद्यार्थ्यामध्ये बुद्धीमतेमध्ये प्रगती होऊन ते इतर शाळेत शिकत आहेत या शाळेतील दोन विद्यार्थी हॉटेल व्यावसायामध्ये जॉब करत आहेत. चांगल्या प्रमाणे उत्पन्न घेत आहेत, विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी यश संपादन करत आहेत. यावेळी या शाळेसाठी तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या फिजोओथेरपी साहित्य व खाऊचे वाटप जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचा हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांनी बनविलेल्या साहित्यांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी शाळेचे तसेच विध्यार्थ्यांचे कौतुक करतानाच सांगितले की, पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा व इतर त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे, विद्यार्थ्यामध्ये असणारे गुण हेरून त्या पद्धतीचे त्यांना शिक्षण दिले पाहीजे, त्यामुळे त्यांच्यात जास्त अधिक प्रगती होऊ शकेल,पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे,

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, मी सुद्धा माझ्या व्यस्त्त कामातून मुलाचा अभ्यास घेत असतो ते पालक म्हणून आपली प्रमुख जबाबदारी आहे,पालकांनी विद्यार्थी साठी वेळ देणे गरजेचे आहे, इतर विद्यार्थ्याप्रमाणे येथील विद्यार्थी नक्कीच प्रगत होतील यात शंका नाही. मात्र त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आत्म विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कोळवणकर यांनी केले.