मंडणगड | प्रतिनिधी : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी दीप प्रज्वलित करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विद्यालयातील शिक्षिका सौ. विनया नाटेकर व श्रीम.अनिता पवार यांनी छत्रपतींचे प्रतिमा पूजन केले .
यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रशालेतील शिक्षक श्री. किशोर कासारे यांनी छत्रपतींचे जीवन व कार्य याविषयी माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी छत्रपतींचे राज्य हे धार्मिक नसून समता प्रस्थापित करणारे होते. त्यांनी अठरा पकड जातीतील सर्व लोकांना, स्वराज्यात सामावून घेऊन संरक्षण दिले. त्यामुळे प्रसंगी हेच लोक त्यांच्यासाठी प्राणाचीबाजी लावू लागले. असे ते म्हणाले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर कासारे यांनी केले व शेवटी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षक श्री.मनोज चव्हाण, श्री. जितेंद्र कळमकर ,शिक्षकेतर कर्मचारी श्री. कृष्णा दळवी, श्री. भाई गुडेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










