वेंगुर्ले l दाजी नाईक :शालेय दशे पासून विद्यार्थ्यांना पत्रकारितेची माहिती व आवड निर्माण व्हावी यासाठी दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली या शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची कार्यक्रमांची माहिती संकलित करण्यासाठी व ती पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी डी.ई.एस न्यूज चॅनल सुरू केला आहे. या चॅनल तर्फे आज शाळेत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी न्यूज चॅनेल च्या वार्ताहर व निवेदिका कु पूर्वा विठ्ठल साळगावकर इयत्ता आठवी हिने बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर शांताराम सोनसुरकर यांनी दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती सांगून भविष्यातील पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना असणारी विविध संधी याबाबत माहिती दिली. पाठ्यपुस्तकांमध्ये असणाऱ्या भाषा विषयातील वृत्तांत लेखन या घटकाचा सराव होण्याच्या दृष्टीने हा कृतीयुक्त उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे असे सांगितले. यावेळी सहशिक्षिका सौ. रेश्मा चोडणकर, कर्मचारी श्री नितीन घोगळे तसेच न्यूज चॅनलचे सर्व बाल पत्रकार, कॅमेरामन न्यूज एडिटर व टीम उपस्थित होते. आभार कुमार मिहीर दाभोलकर यांनी मांनले.












