खेड (प्रतिनिधी) सदगुरु बाबा हरदेवसीहंजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जगभर ‘ प्रकल्प अमृत ‘ दरवर्षी राबवले जाते. या दिवशी निरंकारी मिशनच्या माध्यमातून जलस्रोत, समुद्र किनारे,नदी,तलाव,विहिरी, नाले,पाण्याची टाकी इत्यादी जल संस्थानाच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन ‘ उद्दिष्ट साध्य केले जाते.आणि याच संकल्पनेतून संत निरंकारी मिशन, खेड शाखेच्या वतीने खेड नगरपरिषद पाण्याची टाकीचा आजुबाजूचा सर्व परिसर सुमारे १५० निरंकारी अनुयायी यांच्या मार्फत स्वच्छ करून चकाचक करण्यात आला.
या वेळी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोडगे, श्री.सावंत(स्वच्छता निरीक्षक), कर्मचारी वर्ग उपस्थित होते, श्री.रोडगे यांनी सर्व निरंकारी अनुयायी व निरंकारी मिशनचे निस्वार्थी सेवेचे कौतुक केले. बळीराम शिंदे(मुखी), अंकुश म्हादलेकर (सेवादल अधिकारी),हेमलता गुणदेकर (महिला सेवादल अधिकारी) यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले होते.










