तब्बल १२ दिवसांनी अखेर सान्वीची मृत्युशी झुंज ठरली अपयशी !

सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होती रुग्णालयात

खेड । देवेंद्र जाधव :
नियतीचा डाव कोणाला च कळलेला नाही अगम्य अशा या नियतीच्या डावा पुढे मानवी मेंदू हतबल ठरतो नियतीच्या फेऱ्यात अशीच एक चिमुरडी सापडली अन एक कळी उमलण्या आधी कोमेजून गेली खेड तालुक्यातील दाभिळ कुंभारवाडी येथील ७ वर्षीय सान्वी संदेश पडवेकर या ७ वर्षीय चिमुरडीचा सर्प दंशाने जीवन प्रवास थांबला. तिला झालेला सर्पदंश लक्षात अखेरच्या क्षणी निदर्शनास आला. मात्र तो पर्यत उशीर होऊन गेला होता अन नियतीने डाव साधला. तब्बल १२ दिवस सान्वीची सुरू असलेली मृत्यूची झुंज अपयशी ठरली

ही १० जून २०२५ रोजी शाळेतून परतल्यानंतर संध्याकाळी ६. ३० दरम्यान आपल्या घराच्या अंगणात खेळत होती त्याच वेळी घराच्या
पडवीत साप आल्याचे तिला दिसल्यामुळे तीने आरडाओरड करून घरातल्या माणसांना कल्पना दिली. मात्र या गडबडीत तिला सापाने दंश केला होता हे तिला समजले नाही. त्यानतर ती खेळण्यात मशगुल झाली त्या मध्ये ती पडली अन तिच्या डोक्याला खरचटले अन दाताला देखील लागले होते

दरम्यान सान्वीचे वडील संदेश व आई सरस्वती यांनी तात्काळ जवळच असलेल्या लोटे येथील साईकृपा हॉस्पिटलमध्ये सान्वीला दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना तिचा दात काढण्यात आला त्यानंतर तिला रक्तस्राव सुरू झाला तो थांबतच नव्हता अखेर तिच्या रक्तामधील पेशींची तपासणी केली असता तिच्या पेशी २३ हजारावर आल्याने तिला अन्यत्र हलवण्याच्या सल्ला देण्यात आला त्यानुसार तिला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारा साठी दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरानी तिची नीट तपासणी केली असता डॉक्टराणी घरामधील नातेवाईक ना घरी सर्प विचू असे काही आढळून आले होते का? अशी विचारणा केली असता हो सांगून
सान्वी देखील तिथेच खेळत होती असे सांगितले मात्र त्याच ठिकाणी तिला सर्प दंश झाल्याचे उघड झाले

त्यानंतर तिच्यावर १४ जून पर्यत उपचार सुरू होते मात्र त्या नंतर तिला कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते तिथे उपचार सुरू असताना तिची १२ दिवसांनी २२ जून रोजी प्राणज्योत मालवली

सानवी हिला झालेला सर्पदंश अन तो लक्षात न आल्याने उपचारा मध्ये गेलेला वेळ यामध्ये
सान्वी चा झालेला दुर्दैवी मृत्यू मन हेलावणारा ठरला आहे सान्वी ही जिल्हा परिषद शाळा दाभिळ जांभूळवाडी या शाळेतील इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती. . सान्वीच्या पश्चात आई-वडील व बालवाडीत शिकणारा एक भाऊ असा परिवार आहे.