मत्स्य व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे बुधवारी राजापूर दौऱ्यावर

 

राजापूर lप्रतिनिधी राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्हयाचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. ना. राणे यांच्या या राजापूर दौऱ्यात पाचल व प्रिंदावण येथे भाजपाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर या दौऱ्यात ना. राणे हे राजापुरातील प्रसिध्द श्री देव धुतपापेश्वर मंदिरात भेट देऊन श्री देव धुतपापेश्वराचे दर्शन घेणार आहेत

बुधवारी सकाळी ९.३० वाजता देवगड येथून ना. राणे राजापुर तालुक्यात पाचल येथे येण्यासाठी रवाना होणार आहेत. सकाळी १०. ३० वाजता पाचल येथील भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ना. राणे यांच्या हस्ते होणार असुन यावेळी काही पक्ष प्रवेशही या ठिकाणी ना. राणे यांच्या उपस्थितीत होणार आहेत. यावेळी ना. राणे हे उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर ते राजापूरकडे रवाना होणार असून सकाळी ११.३० वाजता राजापुरातील प्रसिध्द श्री देव धुतपापेश्वर मंदिरात भेट देऊन श्री देव धुतपापेश्वराचे दर्शन घेणार आहेत. तेथून ते प्रिंदावणकडे रवाना होणार आहेत.

दुपारी १२ वाजता प्रिंदावण येथील भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित रहाणार आहेत. यावेळी ना. राणे यांच्या उपस्थितीत या ठिकाणीही पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ना. राणे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता ते कणकवलीकडे पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत.