मंडणगड l प्रतिनिधी : महाराष्ट्र भुषण थोर निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने 2 मार्च 2025 रोजी राबवण्यात आलेल्या महास्वछता अभियानाचे अंर्तगत मंडणगड शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियात चारशे श्रीसदस्य सहभागी झाले होते त्यांनी परिसरातील 13 टन कचरा गोळा केला. सहा ट्रॅक्टर साह्याने परिसरातील ओला व सुका कचरा गोळा करुन त्यांचे विघटन करण्यात आले. याकामी पंचायत समिती मंडणगड व नगरपंचायत मंडणगड यांचे सहकार्य लाभले नगरपंचायत हद्दीतील नऊ प्रभागात सकाळी आठ ते बारा या चार तासांचे कालावधीत हे अभियान राबवण्यात आले.












