मंडणगड l प्रतिनिधी : रिक्षा सेना मंडणगड शहर यांचे रिक्षा चालक मालक संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेल्लन 17 फेब्रुवारी 2024 पाट रोड मंडणगड येते आयोजीत करण्यात आले होते. या निमीत्ताने सत्यनारायणाची महापूजा, भजन यांच्यासह विविध कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष बाळू शिंदे, बाबुराव दुर्गवले, सरचिटणीस विक्रम घैसास, राकेश शिंदे खजिनदार, दिनेश रिकामे, जगन्नाथ लेंडे, रमेश सापटे, तुकाराम पाडावे , मनोज शिंदे, महेंद्र सापटे, श्री. नामुगडे, किरण पोतदार, आबा नगरकर व रिक्षा सेना, मंडणगड रिक्षा चालक मालक संघटना, मंडणगड यांचे सर्व सभासदांनी मेहनत घेतली. शहरातील नागरीकांना मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.











