शहर चिटणीस प्रणाली सावर्डेकर यांचा पुढाकार
चिपळूण (प्रतिनिधी):– भाजपा चिपळूण शहर चिटणीस सौ. प्रणाली अविनाश सावर्डेकर यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील भारतीय समाज सेवा केंद्र येथे जाऊन तिथे संगोपन करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच सौ. प्रणाली सावर्डेकर यांच्याकडून तेथील लहान मुलाना आवश्यक वस्तू देण्यात आल्या. तसेच शहरातील विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये सौ. वंदना जाधव, शर्मिला मोरे, सौ. केतकर, सौ. श्रद्धा फडके, सौ. मानसी केतकर, सौ. स्मिता चितळे, कुंदा खेडेकर तसेच भाजी विकून कष्ट करणार्या महिलांना देखील शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेविका सौ रसिका देवळेकर, सौ. सारिका भावे, सौ. शितल रानडे, सौ. सोनल कारेकर, सौ. पूनम काजारी, सौ. सपना भिसे आदी उपस्थित होत्या.












