सावंतवाडीत राजे प्रतिष्ठानतर्फे महिला दिन साजरा
सावंतवाडी । प्रतिनिधी : जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथे नेहमीच लक्ष्मी नांदते. देशात व राज्यात महायुती सरकारने नेहमीच स्त्रीचा आदर ठेवला आहे. आरक्षणाच्या महिलांना राज्य कारभार करण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात वडीलांप्रमाणे आईचं नाव देखील लावलं जात आहे. हे सरकार नेहमीच लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे, अस मत व्यक्त करत माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजे प्रतिष्ठानतर्फे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, जे काम पुरुष करू शकतात ते आज महिला देखील तेवढ्याच क्षमतेने करू शकतात. त्यामुळेच सिंधुरत्न योजनेतून मोठा लाभ महिलांना दिला जात आहे. समाजात बदल घडवून आणण्याची ताकद महिलांमध्ये आहे. लाडकी बहीण सारखी योजना महिलांसाठी कार्यान्वित आहे.यापुढेही जाऊन राज्यात महिलांसाठी उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम. दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, ज्ञानेश्वर पारधी, कल्याण कदम, साक्षी गवस, पुजा गावडे, सेजल पेडणेकर, संचिता गावडे, अनघा रांगणेकर, सेजल पेडणेकर, अंकिता सावंत, सुभाष गावडे, सगिता पारधी, साक्षी तळवणेकर, अंकिता माळकर, सुहासिनी शेट्ये, आरोही गवस आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.












