एका रात्रीत २० नारळांच्या झाडावरील २५० नारळांची चोरी

उक्षी येथील फार्म हाऊस येथील घटना

रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील उक्षी येथील फार्महाउस येथील 20 नारळांच्या झाडांवरील 6 हजार 750 रुपयांचे तब्बल 250 नारळ अज्ञाताने लांबवले. ही घटना रविवार 9 मार्च रोजी मध्यरात्री 2.30 ते 3.30 वा. कालावधीत घडली आहे.

 

याबाबत संदेश चंद्रकांत जोशी (39, रा. उक्षी जोशीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संदेश जोशी यांचे उक्षी येथे मातोश्री नावाचे फार्महाउस आहे. रविवारी मध्यरात्री या फार्महाउसमधील एकूण 20 नारळांच्या झाडांरील 200 ते 250 नारळ अज्ञाताने काढून नेले. ही बाब जोशी यांच्या लक्षात येताच त्यांनी रविवारी दुपारी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.