रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे मंगळवारी संध्याकाळी ६- ६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटलेली ओव्हरहेड वायर जोडल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. खेड येथे उभी असलेली मांडवी आणि रोहा येथे थांबलेली मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या मार्गस्थ झाल्या आहेत. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले होते.
दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली
दोन गाड्या थांबल्या; वाहतूक लगेचच सुरळीत होईल : रेल्वे प्रशासन
रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे ओव्हरहेड वायर मंगळवारी संध्याकाळी ६- ६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटली. यामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर परिणाम झालेला पाहायला मिळाला. दोन्ही गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ उपाय योजना सुरु करण्यात आल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले होते मात्र अन्यथा उर्वरित गाड्या नियमित वेळेत धावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून आहे तर गोव्याच्या दिशेने जाणार्या मत्स्यगंधा एक्सप्रेस ला रोहा स्थानकात थांबवून ठेवण्यात आले आहे








