किरबेट ( साखरपा)च्या अश्विनी वैद्य ने ताइवान मध्ये केला गुढीपाडवा, हिंदू नवीन वर्ष सण साजरा. 

परदेशामध्ये आपली संस्कृती, परंपरा जपणे हा मुख्य उद्देश. 

 शंकर वैद्य l साखरपा: संगमेश्वर तालुक्यातील किरबेट (साखरपा) येथील अश्विनी यशवंत वैद्य हिने आपल्या भारतीय सहकार्यांना एकत्र घेऊन ताइवान मध्ये गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्ष सण साजरा केला.

अश्विनीने स्वतः फुलांचा हार तयार करून इथल्या प्रमाणे गुढी सजवली व सहकार्यांना घेऊन पूजा करून गोड भोजनाचा आनंद लुटला.

माझ्यासाठी गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्ष तर उत्तर भारतीयांसाठी चैत्र नवरात्र व दक्षिण भारतीयांसाठी साथी उगड़ी सण होता. असे अश्विनीने बोलून दाखवले.

यावेळी कोकणी, महाराष्ट्रीयन पद्धतीचे छोले भाजी, डाल , भात , मिर्चीचा ठेचा, पापड़, भजी, गुलाबजामुन अशा पद्धतीचे जेवण बनवले.

अश्विनी गेले एक वर्ष ताइवान मध्ये टाटा कंसल्टेंसी सर्विसेस मध्ये काम करते.

तिच्यासोबत बेलिंडा बेंजामिन ( कर्नाटक) , शिरीषा पज्जूरी ( कर्नाटक) , यश जैन ( मध्यप्रदेश) , देवेन्द्र राठौर ( राजस्थान) . हे भारतीय सहकारी उपस्थित होते.

आपली भारतीय संस्कृती जपणाऱ्या अश्विनी व तिच्या सहकाऱ्यांना ताइवान नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.