गुहागरच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांची मुंबई येथे प्रशासकीय बदली..!

आबलोली | वार्ताहर : गुहागरच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांची मुंबई येथे प्रशासकीय बदली झाली असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,(एमएमआरडी) मुंबई येथील तहसिलदार संवर्गाच्या रिक्त पदावर त्या हजर होणार आहेत.

श्रीमती प्रतिभा वराळे यांनी गुहागर तालुक्याच्या तहसीलदार पदाचा कार्यकाल अतिशय कर्तव्यदक्षपणे उत्तम रितीने सांभाळला होता गुहागर तालुक्यात अनेक सर्व समावेशक काम करुन त्यांनी जनतेच्या मनात एक आगळं वेगळं स्थान निर्माण केले होतं गुहागर तालुक्यातील कातकरी समाजासह इतर सर्वच घटकांच्या अडी – अडचणी सोडविण्यासाठी त्या तत्परतेने प्रयत्नशील असत त्यांनी गुहागर तालुक्यातील गिमवी कातकरवाडी येथे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे समवेत भव्यदिव्य कार्यक्रम करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते गुहागर तालुक्यातील बचत गटांच्या महिलांसाठी व शेतक-यासाठी त्यांचे विवीध उपक्रम व मार्गदर्शन आजही प्रेरणादायी ठरत आहे. गुहागर तालुक्याच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार श्रीमती.प्रतिभा वराळे यांची प्रशासकीय बदली झाली असून लवकरच त्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,(एमएमआरडी) मुंबई येथील तहसिलदार संवर्गाच्या रिक्त पदावर हजर होणार असून गुहागरच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार श्रीमती.प्रतिभा वराळे यांचा गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री.संदेश साळवी,संचालिका सौ.सावी साळवी यांचेहस्ते सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तहसीलदार श्रीमती.प्रतिभा वराळे यांनी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे वतीने,(एमकेसीएल च्या वतीने )जे -जे शैक्षणिक, सामाजिक व शासकीय उपक्रम राबविले जातात त्या बद्दल समाधान व्यक्त केले यावेळी मंडळ अधिकारी श्री.सचिन गवळी,मंडळ अधिकारी श्री. आनंद काजरोळकर, तलाठी श्री.सुशिल परिहार आदी.मान्यवर उपस्थित होते