रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती NMMS परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.
मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत 2007/ 2008 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सन 2024 /25 मध्ये इयत्ता आठवीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 11 विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापैकी दोन विद्यार्थी कुमार सुरज संतोष खेत्री याने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये खुल्या प्रवर्गातून 32 वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर कुमारी सायली सुधाकर चव्हाण एसटी प्रवर्गातून जिल्ह्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये प्रमाणे इयत्ता बारावी पर्यंत चार वर्षांमध्ये एकूण प्रत्येकी 48,000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सारथी शिष्यवृत्तीसाठी कुमारी शिंदे अस्मि संतोष ही विद्यार्थिनी पात्र ठरली आहे. सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक 9,600 रुपये प्रमाणे इयत्ता बारावी पर्यंत चार वर्षांमध्ये 38 हजार 400 रुपये प्राप्त होणार आहेत. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना संजना तारी, नयना गुरव, श्रीमती लिंगायत मॅडम, श्रीमती नाटेकर मॅडम, श्रीमती वाघमारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना एन एम एम एस , सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थी यांचेवर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, मा. राजनजी मलुष्टे ( अध्यक्ष शाळा समिती ) प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक अनिल चव्हाण, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्यातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे











