खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी विविध उपक्रमांनी होणार साजरा 

लांजा (प्रतिनिधी) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी असणारा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती येथील भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी दिली.

खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस हा १० एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे .या निमित्ताने गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८.३० या वेळेत लांजाची ग्रामदैवत श्री देव पौलस्तेश्वरावर अभिषेक व आरती, त्यानंतर १० वाजता महिलाश्रम लांजा येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार असून महिलाश्रम मधील सर्व मुलांना खाऊ वाटप केले जाणार आहे. त्यानंतर ११ वाजता लांजा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले जाणार आहे . तर दुपारी १२.३० वाजता भांबेड येथे खासदार नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे .

याबरोबरच दिनांक ११ एप्रिल रोजी देवधे येथील वृद्धाश्रमामधील सर्व वृद्धांना ब्लॅंकेट आणि चादर चे वाटप केले जाणार असून त्यानंतर विलवडे

येथील गतिमंदाच्या शाळेतील सर्व मुलांना भोजन दिले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमात भाजपाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील माजी नगरसेवक संजय यादव यांनी केले आहे.