प.पू.देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमात हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन

कणकवली;परम पूज्यनिया देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रम, कणकवली यांच्या वतीने मठात श्री हनुमान जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारी १२ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती निमित्त सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत श्री मारुतीरायांच्या मूर्तीवर अभिषेक व संजय दत्तात्रय वाळके कणकवली या उभयतांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता ओम श्री गुरुवर्य फलाहारी बाबा यांची पाद्यपूजा तसेच परम पुज्यनिया देवी अनुसया माता यांची जयंती, सकाळी १०:३० वाजता श्री सद्गुरुचरणांवर अभिषेक व गुरुपाद्यपूजा संजय दत्तात्रय वाळके, कणकण या उभयतांच्या शुभहस्ते, दुपारी ११ ते १:३० वाजेपर्यंत गुरुवंदना ( सादरकर्ते -तेजस्वीता पेंडूरकर ), सायंकाळी सुश्राव्य भजन ( बुवा- उदय राणे, जानवली ), सायं. सुश्राव्य भजन ( महर्षी भालचंद्र महाराज भज। मंडळ, शांतीधम आश्रम, लोणावळा ) असे कार्यक्रम होणार आहेत.

 

तरी या उत्सवात सर्व भाविक भक्तांनी अगत्य उपस्थित राहून श्रीं चे दर्शन, भजन, नामस्मरण, पारायण, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद तसेच विविध कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. दि. ३० मार्च २०२५ ते दि. १२ एप्रिल २०२५ पर्यंत रोज नामस्मरण करण्यात येणार आहे. दररोज सायं. ७ ते ८ श्री रामरामेश्वरी या ग्रंथाचे वाचन शुभरत्ना निलेश राणे, कणकवली या करणार आहेत. तरी ज्या भाविक भक्तांना या नित्य कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आश्रमात संपर्क साधावा असे आवाहन संचालक मंडळ परम पूज्यनिया देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रम, कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.