राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुका भाजपाच्या वतीने गुरूवारी ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, भारतीय जनता पार्टी राजापूर पश्चिम मंडळ अध्यक्ष सुरेश गुरव, तालुका सरचिटणीस अमोल सिनकर, युवा मोर्चा अध्यक्ष पश्चिम अरविंद लांजेकर, शीतल पटेल, बाबू अवसरे, ऍड. एकनाथ मोंडे, पुर्व मंडळ सरचिटणीस डॉ. मारुती कांबळे, माजी नगरसेवक नागेश शेट्ये, प्रकाश भिवंदे, आशिष मालवणकर आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच डॉ. राम मेस्त्री, डॉ. शिवदे आदी उपस्थितीत होते.
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूरात गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी रूग्णांना फळवाटप करण्यात आले. तर सायंकाळी राजापूर हायस्कुल क्रिडांगणावर भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तर शुक्रवार दि. ११ एपिल रोजी सकाळी ९ वाजता ग्रामिण रूग्णालय राजापूर येथे रक्तदान शिबीर तर सायं. ६ वाजता होम मिनिस्टर स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.












