रत्नागिरी ः प्रतिनिधी : रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे रेल्वेत चढत असताना प्रवाशाची बॅग लांबवून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 39 हजार 800 रुपयांचा मुददेमाल अज्ञाताने लांबवला.ही घटना मंगळवार 23 मे रोजी दु.1 ते 1.15 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,फिर्यादी महिला पतीसह रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून मुंबईला जाण्यासाठी जबलपूर एक्सप्रेसमध्ये चढत असताना अज्ञाताने त्यांची बॅग लांबवली.या बॅगमध्ये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 39 हजार 800 रुपयांचा ऐवज होता.याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











