या पेटीबद्दल 9 महिन्यांनी का झाली पोलिसांत तक्रार पहा
रत्नागिरी | प्रतिनिधी :शहरानजीकच्या खेडशी-भंडारवाडी येथील उघड्या घराच्या रुममधील पेटीतून अज्ञाताने 12 हजार 100 रुपयांचे वेल्डिंगचे सामान अज्ञाताने लांबवले. ही घटना 26 जून 2024 रोजी सायंकाळी 6 ते 27 जून 2024 रोजी सकाळी 9 वा. कालावधीत घडली आहे. याबाबत नउ महिन्यांनंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवार 15 एप्रिल 2025 रोजी तक्रार देण्यात आली आहे.
चेतन चंद्रकांत भूवड (32) यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, खेडशी-भंडारवाडी येथील एका उघड्या घरात ते वेल्डिंगचे काम करायचे. त्या उघड्या घरातील रुममधील एका पत्र्याच्या पेटीला कुलप न लावता त्यात त्यांनी आपली वेल्डिंग इलेक्ट्रिक मशीन, 2 इलेक्ट्रिक ग्रायंडर, ड्रिल मशिन, हॅमर ड्रिल मशीन, इेलक्ट्रिक वायर, लोखंडी हातोडे, बिट ड्रिल मशीन ठेवलेली होती. हे सर्व 12 हजार 100 रुपयांचे सामान अज्ञाताने लांबवले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









