आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे अनुषंघाने गृहनिर्माण संस्था प्रतिनिधींचा अभ्यास वर्ग दिनांक १५ मे २०२५ गुरुवार रोजी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीक रत्नागिरी येथे सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत आयोजित केला आहे. या अभ्यास वर्गास गृहनिर्माण संस्था प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
गृहनिर्माण संस्थासाठी नव्याने प्रस्तावित केलेले नियम व अनुषंघाने माहिती या अभ्यास वर्गाचे माध्यमातून देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार विभाग व जिल्हा हौसिंग फेडरेशनचे माध्यमातून हा अभ्यास वर्ग आयोजित केला आहे. या अभ्यास वर्गास संस्था प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित रहावे.










