रत्नागिरी ः प्रतिनिधी
शरानजीकच्या शिरगाव-गांजुर्डा येथील घरातील कपाट फोडून अज्ञाताने सोन्याचा नेकलेस आणि रोख रक्कम असा एकूण 53 हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना शनिवार 3 मे रोजी सकाळी 8 ते सोमवार 12 मे रोजी रात्री 9.30 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत मोहिद्दीन अमीर हमजा सुंबड (42,रा.शिरगाव गांजुर्डा मशिदीच्या मागे,रत्नागिरी) यांनी बुधवार 14 मे रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 3 ते 12 मे या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन तेथील लोखंडी कपाट कोणत्यातरी हत्याराने उचकटून त्यामधून 40 हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस आणि आणि रोख 13 हजार रुपये असा एकूण 53 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











