आठ तास वीज गायब
चिपळूण (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनी शाखा मार्गताम्हाणे यांचा अत्यंत गलथान कारभार सुरू आहे. दररोज सात ते आठवेळा विद्युत पुरवठा खंडित करतात. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सोमवार दि. १९ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ आठ तास विद्युत पुरवठा खंडित होता. पाच वाजता परत विद्युत पुरवठा खंडित केला गेला. संध्याकाळी करकरीत तिन्ही सांजेला विद्युत पुरवठा पुन्हा खंडित केला.
विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत. दररोज विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे संपूर्ण दळणवळण ठप्प होते. त्याचा परिणाम जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महावितरण विद्युत कंपनीचा अत्यंत गलथान कारभार सुरू आहे. रामपूर उमरोली येथे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, २० मे अखेरीस विद्युत बिले अजूनही दिलेली नाहीत, त्यामुळे ग्राहकांच्या वर बिलांचा बोजा पडला आहे. मार्गताम्हाणे विद्युत कार्यालयात फोन केला असता अधिकारी फोन उचलत नाहीत. विद्युत पुरवठ्यात सुधारणा व्हावी, वारंवार विद्युत पुरवठा बंद करू नये, अशी ग्राहकांची मागणी आहे.










