एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी बनला महसूल सहाय्यक

एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी किरण गोसावी याची महसूल सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील काळसे गावातील रहिवासी किरण प्रकाश गोसावी याने २०१६ मध्ये सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विभागामध्ये पदवी संपादन केली असून ठाणे येथील APLAB कंपनीमध्ये उत्पादन अभियंता म्हणून कार्यरत होता. प्रशासकीय नोकरी करण्याची तीव्र इच्छा असल्याने त्याने एमपीएसीचा अभ्यास सुरू केला. या परीक्षेदरम्यान येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देत आणि कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर त्याने हे यश मिळवले आहे.

त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस.बाडकर, संस्थापक खासदार नारायणरावजी राणे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलम ताई राणे, उपाध्यक्ष आमदार डॉ. निलेशजी राणे तसेच सचिव , आमदार नितेशजी राणे (मत्स्यव्यवसाय ,बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग ) यांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.