चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म सोहोळ्यानिमित्त ‘महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार’ मार्कंडी येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी महाडिक यांना सोमवार दि. २६ मे रोजी दुपारी ३ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राणी महाडिक यांनी सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहून काम केले आहे. कोरोना काळात, तसेच २०२१मध्ये आलेल्या महापुरात त्यांनी लोकांना मदत केली. दहावी, बारावी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या सन्मान करतात. शिवजयंतीला स्पर्धा आयोजित करतात. त्याचबरोबर शिर्डीला पायी जाणाऱ्यांना दरवर्षी त्या पाण्याची व्यवस्था करतात. महिला दिनी महिलांचा सन्मान करतात. याबद्दल भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रेरणा सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, शहराध्यक्ष चिपळूण शहर मंडळ शशिकांत मोदी, विनोद म्हस्के, महिला जिल्हा अध्यक्षा वर्षा ढेकणे, महाराष्ट्र प्रदेश प्रदेश महिला भाजप चित्राताई चव्हाण, स्नेहा मेस्त्री, इतिहासकार ज्योती तोरसकर, शितल रानडे सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर उपस्थित होत्या











