दापोली l प्रतिनिधी: – पाच जून जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा करण्यात येतो .
या निमित्ताने जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “एक पेड मा के नाम” या शासनाच्या ब्रीद वाक्यानुसार घर तिथे वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे .
त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन आणि जलसंवर्धन याची सांगड घालण्याच्या उद्देशाने डॉक्टर प्रशांत परांजपे यांच्या संकल्पनेतून एक रोप दोन खड्डे ही संकल्पना कार्यान्वित करण्यात येणार असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी एक पाझरखड्डा आणि एक रोपट जगविण्याच्या संकल्पनेचा शुभारंभ आज पाच जून रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृह येथे दापोली वन धिकारी, सरपंच ग्रामपंचायत, माजी वसुंधरा अध्यक्ष ,सर्व सदस्य ,गावचे अध्यक्ष ,सर्व महिला मंडळ, बचत गट ,युवक मंडळ ,देवस्थानचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अशी माहिती ग्रामपंचायत जालगाव सूत्रांनी दिली आहे.











