मुलांना संधी उपलब्ध करुन दिल्यास चांगले परिणाम दिसू शकतात_गणेश मंडलीक,गटविकास अधकारी दापोली

दापोली l प्रतिनिधी:-*  “व्हिजनमुळे गुणवत्ता निश्चितच वाढलेली आहे. मुलांना संधी उपलब्ध करुन दिल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.” असे दापोली तालुका गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी आज दापोली येथे झालेल्या व्हिजन दापोली मुख्य समिती, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सभेत मत व्यक्त केले.

 

प्रत्येक शाळेत पोहचण्याचा आपला मानस असून, मुलांमध्ये जोमाने उर्जा भरण्याचे काम करुया. गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची वाढ होईल यासाठी प्रयत्न करावा, कोणत्या विषयात, घटकात कमी पडलो याचे विश्लेषण करुन त्यावर भर देणे गरजेचे आहे. व्हिजन दापोलीचा सुपरिणाम इतर परीक्षांसाठीही होत असून,व्हिजनमुळे गुणवत्ता निश्चितच वाढलेली आहे. तसेच सर्व परीक्षांचा आयुष्यभर उपयोग पडत असतो; यासाठी शाळेतील सर्व मुलांना संधी उपलब्ध करुन दिल्यास चांगले परिणाम दिसू शकतील.

यावर्षी आपण सुक्ष्मपणे नियोजन करुन तालुक्याचा नावलौकिक वाढेल. यासाठी प्रयत्न करु. असे पुढे सांगत जुलै अखेर १००% सेवापुस्तके अद्ययावत करायची असून, केंद्रनिहाय नियोजन करुन कार्यवाही व्हावी. असेही गटविकास अधिकारी मंडलीक यांनी सुचित केले. तर पी.एम. सूर्यघर सर्व शासकिय इमारतींवर बसवणेत येणार असून, सर्वांनी कार्यालयात वेळेत माहिती द्यावी. असे आवाहन केले. तर नवभारत साक्षरता २६७८ तालुक्याचे टार्गेट असून या संदर्भात सर्वांनी गांभिर्याने पहावे. असेही सुचित केले.

आहार, आरोग्य आणि व्यायाम यासंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा लवकरच आयोजीत करु असे आश्वासनदिले. पुस्तक वाचन आणि आरोग्य चांगले असेल तर सर्व गोष्टींवर आपण मात करु शकतो. तद्नंतर विषय समित्यांचे पुनर्गठन तर शिष्यवृत्ती कार्यशाळा, सराव चाचण्या यांचे नियोजन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

“स्पर्धा परीक्षेचा पाया हा व्हिजन” मध्ये असल्याचे व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय शिरसाट यांनी सांगत आभार व्यक्त केले. यावेळी विस्तार अधिकारी मेघा पवार, सचीव सुनिल कारखेले, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्य समिती सर्व सदस्य उपस्थित होते.