मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी रुपाली जयसिंग शिंदे व अंगणवाडी शिंदेवाडी येथील अंगणवाडी सेविका श्वेता सुधाकर शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. वरवेली ग्रामपंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह
शाल व श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, अरुण रावणंग, सेजल शिंदे, माजी सरपंच सुप्रिया देसाई, माजी उपसरपंच धनश्री चांदोरकर,बौद्धवाडी अध्यक्ष व ज्येष्ठ कवी बाळकृष्ण पवार, तेलीवाडी अध्यक्ष दीपक किर्वे, जयसिंग शिंदे, प्रा.राधा शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड,अंगणवाडी सेविका श्वेता शिंदे, प्रसाद विचारे , सायली करंदेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड यांनी केले तर आभार सरपंच नारायण आगरे यांनी मानले.











