शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य संस्थेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी महेश होळंब यांची नियुक्ती!

पालशेत:(वार्ताहर)            संगीत,गायन, कला,क्रीडा,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी तसेच सर्वसामान्य कलावंतांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या शारदा प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी पालशेतचे सुपुत्र रत्नागिरी संगीतरत्न,भजन सम्राट श्री.महेशबुवा नरहर होळंब यांना सन्मानाने नियुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची महान सांस्कृतिक परंपरा,ठेवा जतन करण्यासोबतच विविध माध्यमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनात्मक प्रसार आणि प्रचार करण्याचे मौलिक कार्य शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान अविरतपणे करीत आहे.हा वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी गेली पस्तीस वर्षे अविरतपणे भजन कलेच्या माध्यमातून आपल्या सुमधुर वाणीने परमेश्वराच्या भजनासोबतच समाजप्रबोधनाचे मौलिक कार्य करणाऱ्या प्रतिभासंपन्न श्री.महेश बुवा होळंब यांचेही बहुमोल योगदान आणि सहकार्य आता लाभणार आहे.

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्हयातून संगीत, कला क्षेत्रातून विशेषतः भजन रसिकांकडून श्री.महेश बुवा होळंब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.