वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी अंगीकारले एक रोप दोन खड्डे व्रत

दापोली | प्रतिनिधी : वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करा आणि एक रोपट लावून एक खड्डा पावसाच्या पाण्याकरता मोकळा सोडा या डॉ.प्रशांत परांजपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी महिलांनी रोपांची मागणी केली .
त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षाच्या पूजनानंतर सीताअशोक या महिलांच्या सर्व आजारांवर उपयुक्त असलेल्या वृक्षाची लागवड; ही एक रूप दोन खड्डे या संकल्पनेनुसार जालगाव येथे केली .अतिशय अनुकरणीय असा हा उपक्रम असून प्रत्येक महिलांनीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांनी याचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केले.

या विशेष उपक्रमामध्ये जालगाव च्या माजी ग्रामपंचायत सदस्य अस्मिता परांजपे, गौरी पेंडसे, अश्विनी बापट, शलाका काशिकर, नीलिमा परांजपे आदी महिलांनी सहभाग घेतला.
एक रोप लावून दुसरा खड्डा हा पावसाच्या पाण्यासाठी मोकळा सोडला तर वृक्ष संवर्धन होते हरित आच्छादन वाढते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी देखील वाढण्यास मदत होते .विना खर्च आणि थोडेसे कष्ट केल्यामुळे शरीराला व्यायाम अतिशय उत्तम होतो .जमिनीशी मातीशी संयोग झाल्यामुळे कॅल्शियम ची कमतरता दूर होते . असे अनेक फायदे मिळवण्यासाठी एक रोप दोन खड्डे ही संकल्पना अंगीकारणे आवश्यक आहे.