कोकणातील पर्यटनात वाढणाऱ्या रोजगार संधी

रत्नागिरीत महिलांसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा पुढाकार

रत्नागिरी: कोकणातील निसर्गसंपन्नता, समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे आणि खाद्यपरंपरा यामुळे गेल्या काही वर्षांत कोकण हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर कोकणातील पर्यटन उद्योग झपाट्याने विकसित होत असतानाच, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांसाठी या क्षेत्रात भरपूर रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत आहेत.

स्थानिक महिलांमध्ये असलेली आतिथ्याची परंपरा, स्वयंपाकातील कौशल्य, भाषेची जाण आणि सृजनशीलता ही पर्यटन क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त ठरते. योग्य प्रशिक्षण दिल्यास या स्त्रिया केवळ आत्मनिर्भरच बनणार नाहीत, तर कोकणातील पर्यटनाला देखील स्थानिक चेहरा मिळेल.

हीच गरज ओळखून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे यांच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरी शाखेमार्फत “Travel, Tourism & Hospitality” या क्षेत्रातील १ वर्षाचा सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे हा कोर्स फक्त १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी असून, त्यांना या क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळवून देण्याचा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे. सदर अभ्यासक्रम जुलै २०२५ पासून सुरु करण्यात येणार असून अर्धवेळ स्वरूपाचा असेल. एखादे पदवी शिक्षण घेताना सुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

 

स्थानिक पर्यटन उद्योगासाठी कुशल महिलाशक्ती

कोकणात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होम स्टे, पर्यटन संस्था, मार्गदर्शक, फूड स्टॉल्स आणि पर्यटक सेवा केंद्रे सुरू होत आहेत. या सर्व ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना नोकरीच्या संधी सहज मिळू शकतात. शिवाय, काही महिला आपले पर्यटक गृह (होम स्टे), स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किंवा मार्गदर्शक सेवा सुरू करून स्वतःचा व्यवसायही करू शकतात.

 

कोर्सची वैशिष्ट्ये

अभ्यासक्रम कालावधी: १ वर्ष

पात्रता: १२वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा)

केवळ महिलांसाठी

अनुभवसंपन्न तज्ञांचे मार्गदर्शन

क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिके, इंटर्नशिपचा समावेश

अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मान्यताप्राप्त सर्टिफिकेट

नोकरी व स्वरोजगारासाठी सहाय्य

बाहेर गावच्या विद्यार्थिनीसाठी संस्था परिसरात विद्यार्थिनी वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध

या उपक्रमामुळे रत्नागिरी आणि परिसरातील महिलांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संस्थेच्या वतीने कोकणातील विविध पर्यटन संस्था, हॉटेल्स, होम स्टे, बचत गट व ग्रामपंचायतींशी संपर्क साधून इच्छुक विद्यार्थिनींना या प्रशिक्षणाची माहिती दिली जात आहे.

या कोर्ससंदर्भात अधिक माहितीकरिता इच्छुकांनी बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.

संपर्क: पत्ता: बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरी (BKVTI)

२०१-२०६, एस.बी. नलावडे कमर्शियल कॉम्प्लेस, मारुती मंदिर, रत्नागिरी.

संपर्क: ७४९९८२१३६९ / ९४०३२१४११९

ईमेल: [email protected]