राजापूर l प्रतिनिधी :राजापूर येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अडिवरे येथे गेले असता प्रशासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार यांच्या भेटी घेण्यात आल्या व तेथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधितांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावे अशा सूचना दिल्या
. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह प्रदेश पदाधिकारी शिल्पाताई मराठे, जिल्हा सरचिटणीस अमितजी केतकर, बाळ दाते, वसंत पाटील, भाई फणसे,संदीप गोराठे,संजय दाते,परशराम फणसे,संतोष नांदगावकर, मनीष नांदगावकर,धनंजय मराठे, मंदार खंडकर, राजेंद्र फाळके, समीर सावंत तेथील उपसरपंच सुनील रुमडे आणि स्थानिक ग्रामस्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्थानिक सरपंच यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ताज्या घडामोडी राजापूर अडिवरे येथे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भाजप जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह...








