खेड (प्रतिनिधी)
शहराजवळीत भरणे गवळवाडी जंगलमय भागातील पडक्या शेतघरामध्ये मानवीसदृश्य हाडे असलेला सांगाडा दिसून आला आहे. हा सांगाडा १३ मे रोजी सायंकाळी ५:१५ वाजतापूर्वी दिसून आला आहे. या प्रकारामुळे खेड – भरणे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. पोलीसांनी बेवारस म्हणून आमृ दाखल केला आहे हा सांगाडा नेमका कोणाचा याचा शोध खेड पोलीस घेत आहेत









